Journalist Welfare Fund

मुंबई जिल्हा क्षयरोग कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या वेतनावर गेल्या २० वर्षांपासून काम करीत आहेत. क्षयरोग रुग्णांसाठी औषधे घरपोच देणे, सर्वेक्षणात सहभाग घेणे, रुग्णांना मिळणारे अनुदान घरपोच देणे अशी कामे प्रामाणिकपणे करीत असतात. तर गेल्या दीड वर्षांपासून हे कर्मचारी कोरोनाकाळातही हे सर्व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. मात्र या काळात पालिकेने मंजूर केलेला दैनंदिन ३०० रुपयांचा कोविड भत्ता ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीत दिलेला नाही.

  मुंबई – मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील ४५० कर्मचाऱ्यांना अखेर पाच महिन्यांपासून थकीत असलेले ३०० रुपये दैनंदिन कोविड भत्ता २० सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जनाआधी मिळणार आहेत. ही थकबाकी देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिले. महापौरांच्या अध्यक्षतेखाली आज पालिका प्रशासन आणि म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  मुंबई जिल्हा क्षयरोग कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या वेतनावर गेल्या २० वर्षांपासून काम करीत आहेत. क्षयरोग रुग्णांसाठी औषधे घरपोच देणे, सर्वेक्षणात सहभाग घेणे, रुग्णांना मिळणारे अनुदान घरपोच देणे अशी कामे प्रामाणिकपणे करीत असतात. तर गेल्या दीड वर्षांपासून हे कर्मचारी कोरोनाकाळातही हे सर्व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. मात्र या काळात पालिकेने मंजूर केलेला दैनंदिन ३०० रुपयांचा कोविड भत्ता ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीत दिलेला नाही.

  या बाबतीत पालिका प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर आज महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, संजय वाघ, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, डॉ. प्रणिता टिपरे आदी उपस्थित होते. दरम्यान, कर्मचाऱ्यांना किमान ३० हजार रुपये वेतन द्यावे, नियमानुसार अतिरिक्त भत्ते द्यावेत अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.

  समायोजनाबाबत निर्णय घ्या!

  – क्षयरोग नियंत्रणमधील ३९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना २००८ मध्ये पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

  दरम्यान, क्षुल्लक अनावधानाने झालेल्या चुकीचे कारण देत कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचे इशारे देण्यात येत आहेत. त्यामुळे वयाच्या चाळीशीत दुसरी नोकरी कुठे नोकरी शोधणार असा प्रश्न काही कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत आवश्यक कार्यवाही करवी अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.