मुंबईत अजूनही ४५३ कंटेन्मेंट झोन, ५३७३ इमारती सीलबंद

मुंबईत अजूनही ४५३ कंटेन्मेंट झोन(containment zone) असून सीलबंद इमारतींची संख्या(buildings sealed) ५३७३ इतकी असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याने दिली. कोरोना नियंत्रणात असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुंबई: मुंबईत अजूनही ४५३ कंटेन्मेंट झोन(containment zone) असून सीलबंद इमारतींची संख्या(buildings sealed) ५३७३ इतकी असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याने दिली. कोरोना नियंत्रणात असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुंबईत कोरोना आटोकयात येत आहे. कोरोनाच्या बरे झालेल्या रुगनांचा दर ९२ टक्के असून १ डिसेंबर ते ७ डिसेम्बर या कालावधोत कोरोना रुगनांच्या वाढीचा दर ०.२५ टक्क्यांवर आला आहे. मात्र रुगनसंख्या कमी होत असल्याचा दावा आरोग्य खात्याने केला आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर २८४ दिवसांवर आला आहे. कोरोनाच्या मृतांची संख्याही घटू लागल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य आरोग्य खात्याने दिली आहे.

आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या २ लाख ८८ हजारावर गेली आहे. तर बरे झालेल्या रुगनांची संख्या २ लाख ६२ हजार आहे. बरे होणाऱ्या रुगनांची संख्या वाढत आहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

कंटेन्मेंट झोनची संख्या झोपड़पट्टी आणि चाळीच्या भागात अजूनही जास्त आहे. पालिकेच्या आरोग्य खात्याने या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या बाधित होणाऱ्या रुगनांची संख्या सुमारे ६०० आहे मात्र बरे होणाऱ्या रुगनांची संख्याही तितकीच असल्याचे आरोग्य खात्याने सांगितले.