क्षयरोग रुग्णालयातील ४६ कामगारांना क्वारटाईन न करता ठेवले रुग्णालय परिसरात; रुग्णालय प्रशासनाचा बेजबादारपणा

मुंबई: क्षयरोग रुग्णालयातील एका सफाई कामगाराला १६ एप्रिल ला कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाला, हा कामगार नेरूळ येथे राहणारा होता.

 मुंबई:  क्षयरोग रुग्णालयातील  एका सफाई कामगाराला १६ एप्रिल ला कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाला, हा कामगार नेरूळ येथे राहणारा होता त्यानंतर त्याला  नवी मुंबईमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले.  कोरोना पॉजिटिव्ह कामगाराच्या संपर्कात आलेले  ४६- चतुर्थश्रेणी कामगार, २६-परिचारिका, १- परीसेविका, व २- डॉक्टर्स यांचा समावेश असल्याने, चतुर्थश्रेणी कामगारांना प्रथम केईएम रुग्णालय पाठविण्यात आले, परंतु के एम रुग्णालय कॅज्युअल्टी सीएमओ यांनी सर्व कामगारांना कस्तुरबा रुग्णालयात जाण्याच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे सर्व चतुर्थश्रेणी कामगार कस्तुरबा रुग्णालयात गेले तेथील डॉक्टरांनी क्षयरोग रुग्णालयात १४ दिवसासाठी कॉरंटाईन होण्याच्या सूचना दिल्या सर्व कामगार क्षयरोग रुग्णालयात आले,परंतु क्षयरोग रुग्णालयातील सीएमओ यांच्या आपसातील वादामुळे गुरुवार ची संपूर्ण रात्र कामगारांना रुग्णालय परिसरात काढावी लागली, याबाबत मात्र कर्मचाऱ्या मधे संताप व्यक्त केला जात आहे  पालिका आरोग्य कर्मचाऱ्याना मिळालेल्या या सावत्रपणा बाबत म्युनिसिपल मजदूर युनियनने निषेध व्यक्त केला आहे. 

दरम्यान, कर्मचाऱ्याना मिळालेल्या सावत्रपणाच्या वागणुकीबाबत वरिष्ठ वैद्यकिय अधिकाऱ्याना निवेदन देवून कळविण्यात आले आहे. तसेच शुक्रवारी दुपारी १२.४२ वाजेपर्यंत रुग्णालय प्रशासनाने याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे सर्व चतुर्थश्रेणी कामगारांनी रुग्णालय वैद्यकिय अधिकारी डॉ ललितकुमार आनंदे  यांना होम कॉरंटाईन होत असल्याचा विनंती अर्ज करून सर्व चतुर्थश्रेणी कामगार आप आपल्या घरी निघून गेले असल्याचे कळते.  कामगारांना रात्रभर बाहेर रहावे लागल्यामुळे कामगारांमध्ये रुग्णालय प्रशासन विशेषतः सीएमओ यांच्याबाबत प्रचंड असंतोष व नाराजीचा सूर पसरलेला आहे.
 
कामगार विभागाचे सीएमओ डॉ काला , यांनी जबाबदारी घेतली असती तर कामगारांना बाहेर राहावे लागले नसते, अशी भावना कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत, म्युनिसिपल मजदूर यूनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले की,  कर्मचाऱ्यावर केलेल्या अन्याया बाबत यूनियन निषेध व्यक्त करत आहे. तर या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याना जाब विचारला जाणार असून या प्रकाराला जबाबदार कोण? कोरोना चे सावट असताना हा प्रकार नींदनीय आहे.