राज्यात ४७,२८८ नवीन रुग्णांची नोंद; सोमवारी नवीन रुग्णसंख्या घटली, आज १५५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद मृत्यु संख्येतही घट

आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३०,५७,८८५ झाली आहे. आज २६,२५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २५,४९,०७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३६% एवढे झाले आहे.

  मुंबई : सोमवारी राज्यात ४७,२८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी नवीन रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून आले. तर सोमवारी राज्यात १५५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला. मृत्युची संख्या देखील रविवारच्या तुलनेत घटली आहे.

  आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३०,५७,८८५ झाली आहे. आज २६,२५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २५,४९,०७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३६% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,५१,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  राज्यात आज १५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण १५५ मृत्युपैकी ९० मृत्यु हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २६ मृत्यु जालना-१२, नाशिक-४, नांदेड-२, ठाणे-२, अकोला-२, हिंगोली-१ जळगाव-१, सोलापूर-१ आणि नागपूर-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.

  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०७,१५,७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,५७,८८५ (१४.७६टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,१६,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,११५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  मुंबईत ९८७९ नवे रूग्ण

  दरम्यान मुंबईत दिवसभरात ९८७९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ४६२५६० एवढी झाली आहे. तर आज २१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत ११८०० मृत्यूची नोंद करण्यात आली.