लसीकरणानंतरही 475 जणांचा मृत्यू; हायकोर्टात केंद्राचे शपथपत्र

देशात कोरोनाचे थैमान ओसरत असतानाच लसीकरण मोहीमेलाही वेग आला आहे. तथापि, लसीकरणानंतरही 28 मेपर्यंत 475 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुंबई हायकोर्टात शपथपत्राद्वारे दिली. केंद्र सरकारने 14 पानांचे शपथपत्र हायकोर्टात सादर केले आहे.

    मुंबई : देशात कोरोनाचे थैमान ओसरत असतानाच लसीकरण मोहीमेलाही वेग आला आहे. तथापि, लसीकरणानंतरही 28 मेपर्यंत 475 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुंबई हायकोर्टात शपथपत्राद्वारे दिली. केंद्र सरकारने 14 पानांचे शपथपत्र हायकोर्टात सादर केले आहे.

    या शपथपत्रात घरोघरी लसीकरण केले जाणार असल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. कोरोनाविरोधातील लस व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय तज्ज्ञ समूहाने (एनजीव्हीएसी) हायकोर्टाचा याबाबतचा आदेश पाहिला होता. एनजीव्हीएसीने 25 मे रोजी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली होती.

    ‘नियर टू होम’चा प्रस्ताव

    या निर्णयानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निअर होम कोविड लसीकरण केंद्रासंबंधीची मार्गदर्शक सूचनांची यादी तयार केली आहे. ती वेबसाईटवर प्रकाशित केली आहे. शपथपत्रामध्ये सांगितले की, शपथपत्रामध्ये सांगण्यात आले की, नियर टू होम रणनीतीमध्ये घराजवळ लोकांना लस देता येऊ शकेल. निअर टू होम व्हॅक्सिनेशन सेंटरची जबाबदारी जिल्हा आणि शहरी प्रशासनाची असेल.

    हे सुद्धा वाचा