सामाईक प्रवेश परिक्षांसाठी अर्ज भरण्याच्या वाढविलेल्या कालावधीचा ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना लाभ : उदय सामंत

विद्यार्थी (Students) आणि पालकांच्या (Parents)  विनंतीचा विचार करता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (Exams) कक्ष, मुंबई (Mumbai)  यांनी विविध सामाईक प्रवेश परिक्षांसाठी नव्याने नोंदणी सुरू केली होती. या वाढीव कालावधीचा लाभ ४८हजार ६३४ विद्यार्थ्यांना झाला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले.

मुंबई : विद्यार्थी (Students) आणि पालकांच्या (Parents)  विनंतीचा विचार करता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (Exams) कक्ष, मुंबई (Mumbai)  यांनी विविध सामाईक प्रवेश परिक्षांसाठी नव्याने नोंदणी सुरू केली होती. या वाढीव कालावधीचा लाभ ४८हजार ६३४ विद्यार्थ्यांना झाला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. सामंत म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी विविध सामाईक प्रवेश परिक्षांसाठी अर्ज भरू शकले नव्हते. याबद्दल विद्यार्थी आणि पालकांची मागणी लक्षात घेता राज्य सीईटी सेल’ने दोन दिवसांचा कालावधी वाढविला होता.

७ व ८ सप्टेंबर २०२० असा हा दोन दिवसीय वाढीव कालावधी होता. ज्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतला आहे. या वाढीव कालावधीमध्ये विविध विद्या शाखांच्या सामाईक प्रवेश परिक्षांसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एम.पी.एड. – ३२५ बी.पी.एड. – १२६५ बी.एड. – १६७१५ एम.एड. – ६७७ एल.एल. बी.(तीन वर्ष ) – १२०१० एल.एल. बी.(पाच वर्ष ) – ४०६७ बी.एड. – एम.एड. – ६४९ बी.ए./बी.एस्सी बी.एड. – ११२३ एम.सी.ए. – १८९० बी.एच.एम.सी.टी. – ३६१ एम.एच.एम.सी.टी. – ३७ एम. आर्किटेक्चर– २८७ एम.एच.टी.सी.ई.टी. – ९२२८ या अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.