Best's fleet will include state-of-the-art double decker buses; Sophisticated facilities with two doors, two stairs, CCTV cameras

मुंबईत पालिकेच्या अखत्यारीत सुमारे २०५५ किमी रस्ते आहेत. पावसाळ्यात बहुतांशी रस्ते खड्डेमय होत असल्याची स्थिती आहे. हे प्रमाण वाढल्याने मागील काही वर्षांपासून सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवण्याकडे पालिकेचा सध्या भर आहे. दरवर्षी शंभर किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाते आहे. त्यानुसार पालिकेने रस्ते बांधणीचे नियोजन केले आहे.

    मुंबई : मुंबई महारापालिका वर्षभरात मुंबईतील ४९० रस्त्यांची कामे हाती घेणार असून हे रस्ते सिमेंट -काँक्रिटचे बनवले जाणार आहेत. काही भागात डांबरी रस्त्यांची कामे तर काही भागांमध्ये आवश्यक तिथे रस्तेदुरूस्ती केली जाणार आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने निविदा मागवल्या जात आहेत. येत्या एक ऑक्टोबरपासून नवीन रस्त्यांची कामे सुरू केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

    मुंबईत पालिकेच्या अखत्यारीत सुमारे २०५५ किमी रस्ते आहेत. पावसाळ्यात बहुतांशी रस्ते खड्डेमय होत असल्याची स्थिती आहे. हे प्रमाण वाढल्याने मागील काही वर्षांपासून सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवण्याकडे पालिकेचा सध्या भर आहे. दरवर्षी शंभर किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाते आहे. त्यानुसार पालिकेने रस्ते बांधणीचे नियोजन केले आहे.

    पालिकेच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात रस्ते कामांसाठी करण्यात आलेल्या तरतूदीनुसार यंदाच्या मार्चपासून ऑगस्टपर्यंत सुमारे १२०० कोटींच्या निविदा रस्तेबांधणीसाठी काढण्यात आल्या आहेत. जून आणि जुलैमधील शंभर कोटीच्या निविदांचा यामध्ये समावेश आहे. यंदा १५७ किमी रस्ते कामे प्रस्तावित आहेत. त्यात १४५ सिमेंट काँक्रीट आणि १२ किमी डांबरी रस्त्यांची कामे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.