ipl betting arrest

मुंबई क्राईम ब्रांचने मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब क्रिकेट सामन्यावर बेटींग करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कामगिरी केली आहे. या सट्टेबाजीची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी छापा टाकण्यात आला.

मुंबई : मुंबईत आयपीएल बेटींग (IPL betting) प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने मोठी कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Mumbai Indians-Kings XI Punjab) आयपीएल मॅचदरम्यान बेटिंग केल्याप्रकरणी ५ जणांना अटक  (5 arrested in IPL betting case) करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४४,००० रोख आणि लॅपटॉप सह ९ मोबाईल, वायफाय राऊटर जप्त केले आहेत. मुंबईतील टींबर मार्केट येथील रे रोड परिसरातून या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.