पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; हाय अलर्ट जारी

गेल्या काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेग पकडला असून मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापले आहे. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शनिवारपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेग पकडला असून मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापले आहे. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शनिवारपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    मुंबईसह ठाणे, पालघर, आणि कोकण पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असेल असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे तर पुण्यात आजचा दिवस वगळता पुढील चार दिवस अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा यावर्षीचा सर्वांत मोठा सलग पाऊस असणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर घाटावरील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    हे सुद्धा वाचा