ईडी अधिकाऱ्याने मागितली 5 लाखांची लाच; कंपनीचे गोठविलेले खाते सुरू केले, सीबीआय चौकशी सुरू

सीबीआयने बंगळुरूतील ईडीचे अधिकारी ललित आझाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल अॅप लोन प्रकरणात हैदराबाद येथील गुन्हे शाखा आणि ईडीनेही मनी लाँड्रिंग कायद्यानुसार गु्न्हा दाखल केला होता. सीबीआय सूत्राच्या माहितीनुसार, या प्रकरणात तपास अधिकारी आझादने 5 फेब्रुवारी 2021 रोजी अपोलो नेक्स्ट मुंबईचे प्रबंध संचालक मिखिल यांना ई-मेलद्वारे चौकशीसाठी समन्स बजावले होते. या समन्सवर उपसंचालक मनोज मित्तल जे आयआरएस अधिकारी आहेत, त्यांची स्वाक्षरी होती. 9 फेब्रुवारी रोजी मिखिल यांची चौकशीही करण्यात आली होती.

    दिल्ली : सीबीआयने बंगळुरूतील ईडीचे अधिकारी ललित आझाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल अॅप लोन प्रकरणात हैदराबाद येथील गुन्हे शाखा आणि ईडीनेही मनी लाँड्रिंग कायद्यानुसार गु्न्हा दाखल केला होता. सीबीआय सूत्राच्या माहितीनुसार, या प्रकरणात तपास अधिकारी आझादने 5 फेब्रुवारी 2021 रोजी अपोलो नेक्स्ट मुंबईचे प्रबंध संचालक मिखिल यांना ई-मेलद्वारे चौकशीसाठी समन्स बजावले होते. या समन्सवर उपसंचालक मनोज मित्तल जे आयआरएस अधिकारी आहेत, त्यांची स्वाक्षरी होती. 9 फेब्रुवारी रोजी मिखिल यांची चौकशीही करण्यात आली होती.

    सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मुंबईला परत जात असताना मिखिल यांना आझाद यांचा व्हॉट्सअॅपवर कॉल आला. कंपनीचे गोठविलेले खाते सुरू करावयाचे असेल तर आज रात्रीच 5 लाखांची व्यवस्था करा, असा निरोप त्यांना देण्यात आला. आझाद त्या रात्री बंगलुरूतील लेबल्स पब अॅण्ड किचनमध्येच होते. तेथील वेटरच्या फोनवरून त्याने मिखिल यांना लोकेशनही पाठविले होते.

    आझादच्या मागणीवरून मिखिलने कुटुंबीयांकडून पाच लाखांची रक्कम एकत्रित केली व ती सोपविली. यानंतर 16 फेब्रुवारी 2021 रोजी त्याचे गोठविलले खाते सुरू करण्यात आले. या प्रकरणात कोणकोणते अधिकारी सामिल आहेत याची चौकशी सीबीआय अधिकारी करीत आहेत.

    हे सुद्धा वाचा