5 to 25 rupees increase in toll rate
मुंबईतील प्रवेश १ ऑक्टोबरपासून महागणार

येत्या १ ऑक्टोबरपासून मुंबईच्या (Mumbai) पाचही प्रवेशद्वारांवरील (entry points) टोलच्या दरात (toll rate) ५ ते २५ रुपयांची वाढ होणार आहे.

  • टोलदरात ५ ते २५ रुपये होणार वाढ

मुंबई : मुंबईत (Mumbai) खासगी वाहनाने (private vehicles) ये-जा करणाऱ्यांना आता १ ऑक्टोबरपासून वाढीव टोलचा भार (increase toll rate) सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी (MEP) कंपनीचे टोलनाके (toll naka) आहेत.

महानगर प्रदेशातील ५५ उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च सन २००२ ते २०२७ अशा २५ वर्षांत वसुलीसाठी हे टोलनाके उभारण्यात आले असून राज्य रस्ते विकास महामंडळासोबत (MSRDC) झालेल्या करारानुसार टोलच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ होते.

त्यानुसार आता १ ऑक्टोबरपासून टोल दरवाढ होत असून कार (car), जीपसारख्या (jeep) हलक्या वाहनांच्या एकेरी प्रवास दरात पाच रुपयांची वाढ होऊन आता टोलचा दर ४० रुपये होईल. मिनी बस, १२ ते २० प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्यम वाहनांच्या टोल दरात १० रुपयांनी वाढ होऊन तो ६५ रुपये होईल. ट्रक आणि बसच्या टोल दरात १०५ वरून १३० अशी २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर अवजड वाहनांचा टोल १३५ रुपयांवरून १६० रुपये असा वाढविण्यात आला आहे. हलक्या वाहनांच्या मासिक पासातही वाढ झाली आहे. पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता १४०० रुपयांऐवजी १५०० रुपये होणार आहे.

टोलचे नवे दर

छोटी वाहने – ४० ₹

मध्यम अवजड वाहने – ६५ ₹

ट्रक आणि बसेस – १३० ₹

अवजड वाहने – १६० ₹

हलक्या वाहनांच्या मासिक पासातही वाढ झाली आहे.

पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता १४०० रुपयांऐवजी १५०० रुपये होणार आहे.