घरमालकांकडे टीव्ही बघण्यासाठी म्हणून ती गेली आणि त्याने साधला डाव, ५ वर्षांच्या मुलीवर २३ वर्षीय तरुणाने केला बलात्कार

मेडिकलला शिकणाऱ्या एका २३ वर्षीय विद्यार्थ्याने ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार(5 year old girl raped by 23 year young man) केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

    मुंबईत एका ५ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची(5 year girl raped in mumbai) धक्कादायक घटना घडली आहे. मेडिकलला शिकणाऱ्या एका २३ वर्षीय विद्यार्थ्याने ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

    मुंबईतील जोगेश्वरी भागात बेहराम बाग नावाचा परिसर आहे. या ठिकाणी एका ५ वर्षीय मुलीवर २३ वर्षीय मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या नराधमाने बलात्कार केला. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे आजूबाजूचा परिसर हादरला आहे. सुनील गुप्ता असे आरोपीचे नाव आहे.

    पीडित मुलीचे कुटुंब आरोपीच्या घरातील पोटमाळ्यावर भाड्याने राहत होते. काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे ती आरोपीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली. त्यावेळी नराधम आरोपीने दरवाजा बंद करुन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर काही वेळाने ती मुलगी घरी येऊन रडत होती. तिच्या आईने तिला विचारले असता, तिने हा सर्व घडलेला प्रकार सांगितला.

    यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने याबाबत ओशीवरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ओशीवरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी सुनीलला अटक करण्यात आली. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.