ajit pawar

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालंय. आता हळूहळू व्यवहार पूर्ववत होत असल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. कोरोना संकटामुळे आलेली मंदी जाऊन अर्थव्यवस्था जेव्हा पूर्वपदावर येईल, तेव्हा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत बुधवारी केली. 

    जे शेतकरी शेतीच्या कामासाठी नियमित कर्ज घेतात, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. नियमित कृषी कर्ज घेणाऱ्या आणि महत्त्वाचं म्हणजे ते मुदतीत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.

    कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालंय. आता हळूहळू व्यवहार पूर्ववत होत असल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. कोरोना संकटामुळे आलेली मंदी जाऊन अर्थव्यवस्था जेव्हा पूर्वपदावर येईल, तेव्हा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत बुधवारी केली.

    येत्या ३१ मार्चपर्यंत जर शेतकऱ्यांनी जुने कर्ज फेडले, तर पुढचे कर्ज त्यांना शून्य टक्के व्याजदराने घेता येईल, अशी माहितीदेखील अजित पवार यांनी दिलीय. शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने कर्ज देण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलीय. त्याची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षापासून होणार आहे. जे शेतकरी पूर्वीचं कर्ज फेडून कर्जमुक्त होतील, त्यांना शून्य टक्के कर्जयोजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी दिली.

    कोरोना काळात सेवा क्षेत्राची कामगिरी मंदावली, मात्र कृषी क्षेत्रानेच देशाला तारले. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर अधिक भर देण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या सर्व योजना गरीब आणि मध्यमवर्गियांसाठी असल्याचं स्पष्ट करताना महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात मिळणारी सूट ही श्रीमंतांसाठी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.