बेस्टच्या ५३ कामगारांचा मृत्यू

मुंबई : अत्यावश्यक सेवा देताना बेस्टच्या५३ कामगारांचा करोनाने मृत्यू झाला असून बेस्टच्या ३५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.कोरोनाने५३ कामगार दगावले ही

मुंबई  :  अत्यावश्यक सेवा देताना बेस्टच्या ५३  कामगारांचा करोनाने मृत्यू झाला असून बेस्टच्या ३५०  कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाने ५३ कामगार दगावले ही गंभीर बाब आहे, यामुळे शिवसेनेचा अकार्यक्षम कारभार आणि सत्ताधारी आणि प्रशासनाची कामगारांबाबत उदासीनता यामुळेच कामगार कोरोनाची शिकार होत असल्याचा आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला आहे. २०० कर्मचारी बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.१४२ कर्मचा-यांवर रुग्णालयात उपचार सुरु असून पाच जणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.  

बेस्ट कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहेत. मात्र  बेस्टमध्येही कोरोना संसर्गाचा शिरकाव झाला आहे. बेस्टमधील आतापर्यंत ३५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. याकडे पालिकेने लक्ष देऊन कर्मचाऱ्याना सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.