राज्यात एका दिवसात ५३ जणांचा मृत्यू; राज्यात १०२६ नवे रुग्ण

मुंबई : मुंबईमध्ये मंगळवारी कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात सापडले असले तरी राज्यातील आकडा हा जास्तच राहिला आहे. राज्यात मंगळवारी १०२६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २४,४२७ झाली आहे. तर राज्यात तब्बल ५३ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. राज्यात मंगळवारी ५३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ९२१ झाली आहे. मृतांमध्ये मुंबईमधील सर्वाधिक मृत्यू आहेत.

 राज्यात आजपर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद

 मुंबईमध्ये २८, पुण्यात ६, पनवेल ६, जळगावमध्ये ५ , सोलापूर ३, ठाणे २, रायगड १, औरंगाबाद १, आणि अकोला १ मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २९ पुरुष तर २४ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या ५३ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये ( ६६ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मंगळवारी ३३९ रुग्ण बरे झाले असून राज्यात आजपर्यंत ५,१२५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,२१,६४५ नमुन्यांपैकी १,९५,८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २४,४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १२८९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२,९२३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५४.९२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात २,८१,६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५,६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.