कल्याण डोंबिवलीत ५४  नवीन रुग्ण ; कोरोना रुग्णांची संख्या १०३४

कल्याण पूर्वेतील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू कल्याण : कल्याण पूर्वेत कोरोनाने कहर केला असून आज देखील एकाच दिवशी तब्बल २९ रुग्णांची नोंद याठिकाणी करण्यात आली आहे. यापैकी एका महिलेचा मृत्यू

कल्याण पूर्वेतील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

कल्याण :  कल्याण पूर्वेत कोरोनाने कहर केला असून आज देखील  एकाच दिवशी तब्बल २९ रुग्णांची नोंद याठिकाणी करण्यात आली आहे. यापैकी एका महिलेचा मृत्यू देखील झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ५४  नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ५४  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या  १०३४ झाली आहे. यापैकी आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला असून ३५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ६५०  रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज आढळलेल्या या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील २९, कल्याण पश्चिमेतील ३, डोंबिवली पूर्वेतील ७, डोंबिवली पश्चिमेतील ३, ठाकुर्लीतील ४, शहाड येथील ३, आंबिवलीतील २ तर टिटवाळा येथील ३ रुग्ण आहेत. यामध्ये २४ पुरुष तर २१ महिला, २ मुलं, ७ मुलींचा समावेश आहे. कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथे राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

 आजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील तिसगाव, चिंचपाडा रोड, कोळसेवाडी, कर्पेवाडी, हनुमान नगर, तिसगाव पाडा, चिंचपाडा, नेतीवली, काटेमानिवली, जिम्मीबाग, दुर्गामाता मंदिर रोड, केबिन रोड, आमराई, कल्याण पश्चिमेतील भरताचार्य चौक, वल्लीपिर रोड, आधारवाडी रोड, डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी, आयरेगाव, तुकाराम नगर, एम.आय.डी.सी रोड, राजाजी रोड, मढवी शाळे जवळ, डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा, नवापाडा, सुभाष रोड, ठाकुर्लीतील चोळेगाव, शहाड पश्चिमेतील मंगेशी पँरेडाइज, अंबर हॉटेल जवळ, आंबिवलीतील दत्त मंदिर जवळ, टिटवाळ्यातील मोहन हाईट्स, मांडा, गणेशवाडी मांडा या परिसरातील आहेत.