५५ दिवस झाले निर्बंध हटवा, व्यापारबंदीमुळे ५० लाख लोकांचा रोजगार धोक्यात : व्यापारी संघटनांचे सरकारला साकडे

३१ मे पासून ५५ दिवस झाले  व्यापार बंद आहे. त्यामुळे तब्बल ५० लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियम आणि निर्बंधांचे पालन करायला आम्ही तयार आहोत. पण राज्य सरकारने १ जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती व्यापारी संघटनानी केली आहे.

  मुंबई : राज्य सरकारने १ जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी कळकळीची विनंती व्यापारी संघटनानी केली आहे. बाजारपेठा खुल्या करण्यासाठी कोणती नियमावली असावी, याबाबत प्रस्ताव आम्ही देऊ. सरकारने चर्चा करुन अंतिम नियमावली ठरवावी, पण निर्बंध आणखी वाढवल्यास व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल होतील, असे कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी  प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

  ५० लाख लोकांचा रोजगार धोक्यात

  त्यांनी म्हटले आहे की, ३१ मे पासून ५५ दिवस झाले  व्यापार बंद आहे. त्यामुळे तब्बल ५० लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियम आणि निर्बंधांचे पालन करायला आम्ही तयार आहोत. पण राज्य सरकारने १ जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती व्यापारी संघटनानी केली आहे. यापूर्वीही पुणे आणि मुंबईतील व्यापाऱ्यांनी सरकारकडे १ जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी एफआरटीडब्ल्यूचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केली होती.

  १५ मे नंतर निर्बंध वाढवण्यास विरोध

  व्यापाऱ्यांचा यापूर्वी १५ मे नंतर निर्बंध वाढविण्यास विरोध होता. मात्र, मुंबई वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये कोरोनाचा धोका कायम असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांची ही मागणी मान्य केली नव्हती. त्यामुळे राज्यातील व्यापारी समाज नाराज झाला होता. मात्र, कोरोना आणि म्युकरमायकोसिस या दुहेरी संकटामुळे ठाकरे सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नसल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यानी आणखी काही दिवस निर्बंध वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

  55 days after lifting of trade embargo trade ban threatens employment of 5 million people