covid 19 test

    मुंबई : शनिवारी राज्यात ५५,४११ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३३,४३,९५१ झाली आहे. आज ५३,००५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.१८% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५,३६,६८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात आज ३०९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ३०९ मृत्यूंपैकी १७६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

    हे ६० मृत्यू, पालघर-२४, नांदेड-९, नागपूर-५, नाशिक-५, सांगली-५, जालना-४, पुणे-३, परभणी-२, गडचिरोली-१, जळगाव-१ आणि सोलापूर-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१८,५१,२३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३३,४३,९५१ (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,४१,०८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,२९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    दरम्यान, मुंबईत दिवसभरात ९३३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ५१०५१२ एवढी झाली आहे. तर, आज २८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत ११९४४ मृत्यूची नोंद करण्यात आली.