Corona-death

मंगळवारी राज्यात ५५,४६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३१,१३,३५४ झाली आहे. आज ३४,२५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २५,८३३३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९८% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,७२,२८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई : मंगळवारी राज्यात ५५,४६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३१,१३,३५४ झाली आहे. आज ३४,२५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २५,८३३३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९८% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,७२,२८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात आज २९७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण २९७ मृत्यूपैकी १५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८५ मृत्यू हे मागील अाठवड्यातील अाहेत. उर्वरित ६२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे अाहेत. हे ६२ मृत्यू पालघर-१८, नागपूर-१०, जळगाव-८, नाशिक-६, नांदेड-५, जालना-३, ठाणे-३, अकाेला-२, रायगड-२, सांगली-२, नंदूरबार-१, वाशिम-१, पुणे-१ असे आहेत.

    सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०९,१७,४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१,१३,३५४ (१४.८८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,५५,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२,७९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    दरम्यान, मुंबईत दिवसभरात १००४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ४७२६०० एवढी झाली आहे. तर आज ३२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत ११८३२ मृत्यूची नोंद करण्यात आली.