56 आमदार, तरीही मुख्यमंत्री; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. पाठीत खंजीर खुपसणारे, असे म्हटले की आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो, अशा शब्दांत पाटील मुख्यमंत्र्यांवर बरसले. यापुढे भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल आणि एकट्याच्या जीवावर सत्ता आणेल. आम्हाला युतीत कोणीही नको, असे म्हणत पाटील यांनी युतीबद्दल महत्त्वाचे विधान केले.

    मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी शिवसेनेसोबतच्या युतीबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. पुढील निवडणुकांमध्ये भाजपासोबत कोण असेल, कोण नसेल याबद्दल पाटील यांनी अतिशय स्पष्ट विधान केले. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता पाटील यांनी सडकून टीका केली. नाव मोठे लक्षण खोटे, अशा शब्दांत पाटील मुख्यमंत्र्यांवर बरसले.

    पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. पाठीत खंजीर खुपसणारे, असे म्हटले की आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो, अशा शब्दांत पाटील मुख्यमंत्र्यांवर बरसले. यापुढे भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल आणि एकट्याच्या जीवावर सत्ता आणेल. आम्हाला युतीत कोणीही नको, असे म्हणत पाटील यांनी युतीबद्दल महत्त्वाचे विधान केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने निवडून यायचे आणि मग त्यांच्यावरच उठता-बसता टीका करायची, असा उद्योग सुरू आहे. सकाळी ब्रश करण्यापूर्वीच मोदींच्या नावाने शिमगा सुरू होतो. मोदी हे आमचे आई बाप आहेत. तुमच्या आई बापाला शिव्या दिलेले तुम्हाला चालेल का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

    काही पक्ष आपल्यासोबत प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष, विनायक मेटेंच्या शिवसंग्राम, महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांती संघटनेचा समावेश होतो. याशिवाय आणखी काही छोटे पक्ष सोबत आहेत. मात्र काही जणांची स्थिती नाव मोठे आणि लक्षण खोटे अशी आहे. 56 आमदार असताना ते मुख्यमंत्री झाले आहेत.

    - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा