प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

  मुंबई : बुधवारी राज्यात ५९,९०७ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर आज ३२२ काेराेनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. सहा महिन्यानंतर (ऑक्टाेबर-२०२०) राज्यात मृत्युची संख्येत आज वाढ झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.७९% एवढा आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३१,७३,२६१ झाली आहे.

  बुधवारी ३०,२९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २६,१३,६२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.३६% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५,०१,५५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
  राज्यात आज ३२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ३२२ मृत्युपैकी १२८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

  उर्वरित ७५ मृत्यू हे एक अाठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७५ मृत्यू नागपूर-२१, पालघर-१५, साेलापूर-९, जळगाव-७, जालना-४, पुणे-४, बुलढाणा-३, यवतमाळ-३, अकाेला-२, नांदेड-२, ठाणे-२, गडचिराेली-१, गाेंदिया-१ आणि रायगड-१ असे आहेत.
  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,११,४८,७३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१,७३,२६१ (१५.००टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,७८,५३० व्यक्ती हाेम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २१,२१२ व्यक्ती संस्थ‌ात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  दरम्यान, मुंबईत दिवसभरात १०४४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ४८३०४२ एवढी झाली आहे. तर आज २४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत ११८५६ मृत्यूची नोंद करण्यात आली.