अंत्यविधीला जाणे पडले महागात- विक्रोळीत ६ जणांना झाली कोरोनाची लागण

मुंबई : विक्रोळीमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या एका महिलेच्या अंत्यसंसकाराला जाणे ६ जणांना महागात पडले आहे. कोरोनाबाधित या महिलेच्या मुलासह आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे

मुंबई : विक्रोळीमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या एका महिलेच्या अंत्यसंसकाराला जाणे ६ जणांना महागात पडले आहे. कोरोनाबाधित या महिलेच्या मुलासह आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमावरी स्पष्ट झाले आहे . त्यामुळे विक्रोळीमध्ये खळबळ  उडाली आहे. दरम्यान सोमवारी आणखी २ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तब्बल आठ जणांना लागण झाली असून आतापर्यंत विक्रोळीत २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विक्रोळीतील टागोर नगरमध्ये राहणाऱ्या महिलेची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पण त्यानंतर करण्यात आलेल्या तिच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या महिलेचा कोणताही प्रवास केल्याचा इतिहास नव्हता. तर कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तिला कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान या महिलेच्या अंत्यसंस्काराला परिसरातील काही नागरिक आले होते. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराला आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल सोमावरी आला असून मृत महिलेच्या मुलासह सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या परिसरातील सुमारे ५० जणांना हिरानंदानी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. 

विक्रोळीमध्ये सोमवारी आणखी दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सोमावारी विक्रोळीमध्ये आठ कोरोनाचे रुग्ण सापडले. या दोन कोरोनाबाधितांपैकी एक रुग्ण कन्नमवार नगर २ मधील आदित्य इमारतीमध्ये तर दुसरा रुग्ण विक्रोळी गावात सापडला. रुग्ण सापडलेले परिसर व इमारत पालिकेकडून सील करण्यात आली आहे.