pratap sarnaik shivsena

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आज मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी(pratap sarnaik inquiry in ED office) ११वाजता हजर झाले होते. तब्बल ६ तास त्यांची चौकशी करण्यात आली.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आज मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी(pratap sarnaik inquiry in ED office) ११वाजता हजर झाले होते. तब्बल ६ तास त्यांची चौकशी करण्यात आली. टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत २४ नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

आज चौकशीनंतर बाहेर पडल्यावर प्रताप सरनाईकांनी सांगितले की, मला दोनदा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही. ईडीच्या चौकशीत सगळ्या अँगलने विचारणा करण्यात आली. यात राजकीय, कौटुंबिक, इतर व्यवहार याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. या उत्तरांनी ईडीचे समाधान झाले की नाही, हे मला माहित नाही. पण त्यांनी मला परत बोलावलं नाहीये. मी त्यांना सांगितलं आहे की जर टॉप सिक्युरिटीमध्ये घोटाळा झाला असेल तर जरुर चौकशी झाली पाहीजे. मी चौकशीसाठी सहकार्य करेन.

सरनाईक यांनी पुढे सांगितले की, नोटीस बजावण्याची गरज नाही. यापुढे जर मला चौकशीसाठी बोलावण्यात आले तर २ तासांमध्ये हजर होईन.