राज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद

राज्यात काल २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६६,४४,४४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,५८,०७९ (१३.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

    मुंबई: शनिवारी राज्यात ६,२६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,५८,०७९ झाली आहे. काल ७,३३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,२९,८१७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३५ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ९३,४७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात काल २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६६,४४,४४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,५८,०७९ (१३.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२७,७५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ४१०:

    मुंबईत दिवसभरात ४१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३३७५४ एवढी झाली आहे. तर ९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५८२७ मृत्यूची नोंद करण्यात आली.