प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ आज सकाळी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. माहितीनुसार, गोरेगाव येथे राहणाऱ्या या चिमुकलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केला आहे. पोक्सो प्रकरणात सध्या अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. जो बलात्कार करणार असतो तो तिच्या नात्यातला किंवा ओळखीचा असतो. असाच प्रकार गोरेगावमध्ये घडला आहे.

मुंबई : हाथरस प्रकरणानंतर अनेक बलात्कार (Rape)  झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. आता मुंबईतील (Mumbai) गोरेगावमध्ये एका चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरे कॉलनीत ६ वर्षीय चिमुकलीवर (6-year-old girl) बलात्कार झाला आहे. सोमवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली आहे. यासंदर्भात तक्रार दाखल होताच गोरेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ आज सकाळी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. माहितीनुसार, गोरेगाव येथे राहणाऱ्या या चिमुकलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केला आहे. पोक्सो प्रकरणात सध्या अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. जो बलात्कार करणार असतो तो तिच्या नात्यातला किंवा ओळखीचा असतो. असाच प्रकार गोरेगावमध्ये घडला आहे.

सोमवारी दुपाारी साडे चारच्या सुमारास चिमुकलीने तिच्यासोबत घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी त्वरित आरे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील हे प्रकरण तितकच गांभीर्याने घेत तातडीने पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. हाथरसमधील सामूहिक बलात्कारच्या घटनेनंतर देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.