राज्यात रोज 600 मेट्रिक टन ऑक्सिजन तुटवडा; एका रुग्णाला सरासरी दिवसाला 12 लिटर ऑक्सिजन लागत

कोरोना रुग्णांची मुंबईत संख्या कमी होत असली तरी राज्यात मात्र अजुनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दिवसाला 67 हजार रुग्ण आजही आढळत आहेत. यातील 10 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यात दिवसाला 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील (एफडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

    मुंबई : कोरोना रुग्णांची मुंबईत संख्या कमी होत असली तरी राज्यात मात्र अजुनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दिवसाला 67 हजार रुग्ण आजही आढळत आहेत. यातील 10 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यात दिवसाला 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील (एफडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

    आधीच राज्यात 300 मेट्रिक टनची टंचाई असताना आठवड्याभरात मागणी आणखी 300 मेट्रिक टनने वाढली आहे. मुळातच मागणी आता 1800 मेट्रिक टनची असल्याने 600 मेट्रीक टनचा तुटवडा आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. राज्यातील वाढत्या ऑक्सिजनची गरज कशी पूर्ण करायची हा प्रश्न राज्य सरकार आणि एफडीएसमोर उभा ठाकला आहे.

    परराज्यातून ऑक्सिजन मागवण्यासह अन्य कोणकोणत्या माध्यमातून ऑक्सिजनचा साठा वाढवता येईल यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आज केवळ आणि केवळ कोविडसाठी (पॉझिटिव्ह रुग्ण) 1570 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. तर संशियत कोरोना रुग्ण आणि इतर अर्थात नॉन कोविड रुग्ण यांना 230 मेट्रिक टन असा एकूण 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. दरम्यान एका रुग्णाला सरासरी दिवसाला 12 लिटर ऑक्सिजन लागत आहे.