CWC कामांतील निविदा प्रक्रियेत ६३ अभियंता दोषी; ५० कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून पैसे कापणार

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील २४ वॉर्डातील लहान रस्ते, गटारांची दुरुस्ती अथवा स्वच्छता अशी विविध कामे सी. डब्लू.सी. अंतर्गत केली जातात. या कामांसाठी ई कोटेशन व विभाग स्तरावर निविदा प्रक्रिया राबवली जाते. विभाग स्तरावर मागवण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया संगणकात अपलोड करताना अनियमितता आढळून आली.

    मुंबई : सी डब्लू सी कामांतील ई कोटेशन निविदा प्रक्रियेत अनियमितता आढळल्याने मुंबई महापालिकेने केलेल्या चौकशीत ८३ पैकी २० कर्मचारयांना दोषमुक्त जाहीर केले असून ६३ कर्मचारी व अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. ६३ पैकी १३ अभियंत्यांना कठोर शिक्षा म्हणून त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून ठराविक रक्कम कायमस्वरूपी वगळण्यात यावी, तर ५० अभियंत्यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून एका महिन्यासाठीची रक्कम वसूल करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. या संदर्भातील प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.

    मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील २४ वॉर्डातील लहान रस्ते, गटारांची दुरुस्ती अथवा स्वच्छता अशी विविध कामे सी. डब्लू.सी. अंतर्गत केली जातात. या कामांसाठी ई कोटेशन व विभाग स्तरावर निविदा प्रक्रिया राबवली जाते. विभाग स्तरावर मागवण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया संगणकात अपलोड करताना अनियमितता आढळून आली.

    अनियमितता आढळल्यानंतर ८३ अभियंत्यांचे खात्या अतंर्गत चौकशीचे आदेश पालिका आयुक्तांनी वरिष्ठ अधिकारयांना दिले. वरिष्ठ अधिकारयांनी केलेल्या चौकशीत ८३ पैकी २० अभियंत्यांना दोषमुक्त जाहीर करण्यात आले आहे. तर ५० अभियंत्यांवर किरकोळ शिक्षा म्हणजे त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून एक महिना ठराविक रक्कम आकारण्यात यावी. तर १३ अभियंत्यांवर कठोर शिक्षा ठोठावत त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून कायमस्वरुपी ठराविक रक्कम आकारण्यात यावी, असे चौकशी समितीने स्पष्ट केले आहे.

    एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना