राज्यात ६६,३५८ नवीन रुग्णांची नोंद; मुंबईत दिवसभरात ३९९९ जणांना कोरोनाची बाधा

मंगळवारी राज्यात ६६,३५८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४४,१०,०८५ झाली आहे. आज ६७,७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ३६,६९,५४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.२१ एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,७२,४३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई : मंगळवारी राज्यात ६६,३५८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४४,१०,०८५ झाली आहे. आज ६७,७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ३६,६९,५४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.२१ एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,७२,४३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान, राज्यात मंगळवारी ८९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ८९५ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

    हे ३२४ मृत्यू, औरंगाबाद-१३९, पुणे-५८, नाशिक-३६, नागपूर-२०, गडचिरोली-१४, अहमदनगर-१०, ठाणे-१०, नांदेड-६, यवतमाळ-६, बुलढाणा-५, चंद्रपूर-३, परभणी-३, भंडारा-२, नंदूरबार-२, सोलापूर-२, वाशिम-२, बीड-१, जळगाव-१, उस्मानाबाद-१, रायगड-१, सांगली-१ आणि सिंधुदूर्ग-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,६२,५४,७३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४,१०,०८५ (१६.८० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
    सध्या राज्यात ४२,६४,९३६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,१४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    दरम्यान, मुंबईत दिवसभरात ३९९९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६३,५४८३ एवढी झाली आहे. तर आज ५९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत १२,९२० मृत्यूची नोंद करण्यात आली.