राज्यात ६,९१० रुग्णांची नाेंद , तर मुंबईत दिवसभरात ३४८ बाधित

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,००,९११ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ९४,५९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान राज्यात काल १४७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे.

  मुंबई : मंगळवारी राज्यात एक लाखांपेक्षाही कमी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या असल्याचे समाेर आले आहे. काेराेना राेखण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या नवनवीन उपाययाेजनांमुळे नवीन रुग्णसंख्येत घट हाेत असल्याचे सकरात्मक दिसून येत आहे. मंगळवारी राज्यात ६,९१० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,२९,५९६ झाली आहे. काल ७,५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले.

  राज्यात आजपर्यंत एकूण ६०,००,९११ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ९४,५९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान राज्यात काल १४७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे.

  आज राज्यातील कोविड बाधित रुग्ण संख्येचे दिनांक १० जुलै पर्यंतचे तर कोविड मृत्यूंचे १२ जुलै पर्यंतचे माहिती अद्ययावत केल्याने काल राज्याच्या एकूण रुग्ण संख्येत २४७९ ने वाढ झाली. राज्यातील एकूण मृत्यूसंख्या ३५०९ ने वाढली आहे. तथापि रुग्ण नोंदी अद्ययावत करण्यासोबतच दुहेरी नोंद वगळणे, रुग्णाच्या रहिवाशी पत्त्यानुसार झालेले बदल इत्यादी कारणांमुळे काही जिल्ह्यांच्या रुग्ण आणि मृत्यू संख्येत वाढ अथवा घट झाली आहे.

  दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५८,४६,१६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२९,५९६ (१३.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६०,३५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,९७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  मुंबईत दिवसभरात ३४८:

  मुंबईत दिवसभरात ३४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३२१५२ एवढी झाली आहे. तर १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५७८७ मृत्यूची नोंद करण्यात आली.