लॉकडाऊनच्या काळात बालभारतीने छापली ७ कोटी पुस्तके

मुंबई : लॉकडाऊननंतर केवळ ५०० कर्मचार्यांेच्या मदतीने बालभारतीने ७ कोटी पुस्तके छापून ती राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्यांापर्यंत पोहोचविले आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी

मुंबई : लॉकडाऊननंतर केवळ ५०० कर्मचार्यांेच्या मदतीने बालभारतीने ७ कोटी पुस्तके छापून ती राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्यांापर्यंत पोहोचविले आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठयपुस्तक मिळणार असल्याची माहिती बालभारतीच्यावतीने देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळातही बालभारतीच्या कर्मचार्यां नी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पडल्यामुळे आज प्रत्येक विक्रेत्याला पुस्तके मिळाली असल्याचे सांगण्यात आले.  राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आले आहे.

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यामुळे पालकांनी पुस्तकांच्या दुकानाकडे धाव घेतली. दुकानांमध्ये बालभारतीची पुस्तके मोठ्या प्रमाणात पोहोचली असून पालकांनी पुस्तके विकत घेण्यास सुरू केली आहे. हे सर्व पुस्तके पालकांना सोप्या पद्धतीने एका जागी मिळावे यासाठी बालभारतीच्यावतीने आखण्यात आलेल्या मोठ्या योजनेचा परिणाम आहे.   मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुस्तकांची निर्मिती आणि त्याची छपाई करण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर छपाई सुरू झाली मात्र २२ मार्चपासून राज्यात लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प ज़ाले. त्यानंतर पुन्हा एक बैठक घेऊन जेवढे कर्मचारी उपलब्ध आहे त्याच्या सहाय्याने पुस्तकांची छपाई करण्याची योजना आखली.जवळ राहणार्याा ५०० कर्मचार्यांयच्या आधारे रात्रदिवस काम करत ७ कोटी पुस्तकांची छपाई करण्यात आली. ती सर्व पुस्तके बालभारतीच्या कर्मचार्यां च्या सहाय्याने प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात पोहोचविण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील पुस्तक भांडारात जमा करण्यात आली.

शाळा सुरू होईल तेव्हा पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील. लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीत अशक्य काम शक्य करणार्यात कर्मचार्यांकचे बालभारतीच्या संचालकांनी कौतुक केले. बारावीच्या नवीन पुस्तकांची छपाई सुरू असून ती लवकरच बाजारात उपलब्ध होतील  १ कोटी २२ लाख पुस्तके डाउनलोड लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी बालभारतीने आपली सर्व पुस्तके संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली. त्यामुळे सर्व कोचिंग क्लासेस आणि विद्यार्थ्यांनी डाउनलोड केली आणि आपले शिक्षण सुरू ठेवले. १ मार्च ते १४ जून २०२० या काळात १ कोटी २२ लाख ६५ हजार पुस्तके डाउनलोड करण्यात आली असल्याची माहिती यावेळी बालभारतीच्यावतीने देण्यात आली.