world aids day

मागील काही महिन्यांपासून तब्बल सात हजार एचआयव्ही रुग्ण नियमित औषधांसाठी एआरटी केंद्रात आलेच नसल्याचे उघड झाले आहे. मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्था या रुग्णांचा युद्ध पातळीवर शाेध घेत आहे.

नीता परब, मुंबई: मुंबई शहरात मागील अनेक महिन्यांपासून काेविडमुळे अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागत आहे. अनेक गाेरगरीब, मध्यमवर्गीय कोरोनाच्या भीतीपाेटी मुंबई साेडून परगावी गेले असल्याचे समाेर आले आहे. यात अनेकजण एचआयव्ही रुग्णही असू शकतात, अशी शंका आराेग्य अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे मागील काही महिन्यांपासून तब्बल सात हजार एचआयव्ही रुग्ण(hiv patients in mumbai) नियमित औषधांसाठी एआरटी केंद्रात आलेच नसल्याचे उघड झाले आहे. मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्था या रुग्णांचा युद्ध पातळीवर शाेध घेत आहे.

मुंबई शहर व उपनगरात आजघडीला ३९,८०० एचआयव्ही रुग्णांची नाेंद मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्थेच्या दप्तरी नाेंद आहे. या रुग्णांमधील राेगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरीता व इतर काेणत्याही आजाराची या रुग्णांना लागण हाेवू नये यासाठी ॲन्टी रेट्राेवायरल ट्रीटमेंट (एआरटी)औषध दिली जातात. यािशवाय रुग्णांना एक ग्रीन कार्ड ही दिले जाते, या कार्डच्या माध्यमातून रुग्ण दर महिन्याला सेंटरमधून नियमित औषध घेवून जातात. मात्र काेराेनाच्या काळात मागील काही महिन्यांपासून तब्बल सात हजार रुग्ण नियमित औषधांसाठी केंद्रात आलीच नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ज्यामुळे या सात हजार रुग्णांना मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था फाेन, घरचा पत्ता, पर्यायी फाेन नंबर अशा विविध मार्गाने या रुग्णांचा शाेध घेत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात येत आहे.

एप्रिल महिन्यात लाॅकडाऊनची घाेषणा करण्यात आली. त्यादरम्यान एआरटी केंद्राच्या माध्यमातून मुंबई शहरातील एचआयव्ही रुग्णांची माहिती जमा करत या रुग्णांना नियमित औषध घेण्यात काही समस्या तर उद्गभवत नाहीत ना? याची माहिती घेतली. या दरम्यान असे लक्षात आले की, साधारण १० हजार रुग्ण नियमित औषध घेण्यास आलीच नाहीयेत तर काही रुग्णांबराेबर संपर्कच हाेत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर विविध मार्गाने या रुग्णांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला ज्यात केवळ तीन हजार रुग्णांचा संपर्क हाेवू शकला व एआरटी केंद्रातून औषध घेण्याबाबत सांगण्यात आले. परंतु अद्यापही सात हजार रुग्णांपर्यंत पाेहचणे शक्य हाेत नाहीये, या उर्वरित रुग्णांचा विविध मार्गाने शाेध घेत आहाेत परंतु संपर्क हाेत नाहीये, या रुग्णांपर्यंत पाेहचण्याचे आमचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

- डाॅ. श्रीकला आचार्य , संचालिका मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थ‌ा