…तर संपूर्ण महाराष्ट्र अंधारात जाईल; ऊर्जा खात्याचं वसुली प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचलं

, या प्रकारावर अर्थमंत्री अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे. अर्थमंत्रालयाने वीज मंत्रालयाला आर्थिक मदत न केल्यास महाराष्ट्र कधीही अंधारात लोटला(Blackout in Maharashtra) जाऊ शकतो, असा इशारा ऊर्जा विभागाने दिला आहे.

  मुंबई : राज्याच्या ऊर्जा विभागाची आर्थिकी स्थिती डळमळीत झाली असून थकित बिलांची वसुली न झाल्याने ही रक्कम 73000 कोटींवर पोहोचली आहे. यामुळे वीज उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेडकडे (महाजेनको) कोळशाचाही तुटवडा भासू लागला आहे. कोळशाचा केवळ दोनच दिवस पुरेल इतका साठा असताना आता ऊर्जा विभागाने कोळसा खरेदीसाठी मदत करावी म्हणून अर्थमंत्रालयाकडे हात पसरले आहे.

  दरम्यान, या प्रकारावर अर्थमंत्री अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे. अर्थमंत्रालयाने वीज मंत्रालयाला आर्थिक मदत न केल्यास महाराष्ट्र कधीही अंधारात लोटला(Blackout in Maharashtra) जाऊ शकतो, असा इशारा ऊर्जा विभागाने दिला आहे.

  उद्योग सब्सिडीत 1200 कोटींचा घोटाळा

  विदर्भ, मराठवाडासह अन्य जिल्ह्यातील उद्योगांना देण्यात येत असलेल्या सब्सिडीत 1200 कोटींचा घोटाळा समोर आल्यानंतर ऊर्जा विभागाने यावर तत्काळ स्थगिती दिली होती. चौकशीसाठी समितीची स्थापन करण्यात आली परंतु अहवाल येण्यापू्र्वीच पुन्हा सब्सिडी सुरू केली. या प्रकारावरही अर्थमंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. विभागात संकट सुरू आहे तर सब्सिडी का सुरू करण्यात आली असा सवाल पवार यांनी केला आहे.

  निधीच नाही

  वीज उत्पादन करणारी कंपनी महाजेनकोकडे कोळशाचा तुटवडा असून पूर्वी जेथे सात ते 12 दिवसांचा साठा असायचा तेथे आज केवळ दोनच दिवस पुरेल इतका साठा आहे. निधीच नसल्याने कोळशाची खरेदीही थांबली आहे. कोळशाच्या कमतरतेचा परिणाम वीज उत्पादन होण्याची शक्यता असून यामुळे महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता आहे.