मुंबईमध्ये कोरोनाचे ७४८ नवे रुग्ण ; बाधितांची संख्या ११९६७ वर

कोरोनाबाधित २५ रुग्णांचा शुक्रवारी मृत्यू मुंबई :मुंबईत शुक्रवारी ७४८ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ९६७ वर पोहचली आहे.त्याचप्रमाणे २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित २५ रुग्णांचा शुक्रवारी मृत्यू

मुंबई : मुंबईत शुक्रवारी ७४८ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ९६७ वर पोहचली आहे.त्याचप्रमाणे २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ४६२ वर पोहचला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून शुक्रवारी ७४८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत.त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ११९६७ वर पोहचली आहे.

४ ते ६ मेदरम्यान प्रयोगशाळांमध्ये केलेल्या २०६ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल शुक्रवारी आल्याने त्याचाही यात समावेश केला आहे. मुंबईमध्ये २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४६२ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या २५ जणांमध्ये १३ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये १३ पुरुष तर १२ महिलांचा समावेश आहे.

मृतांमधील १३ जण हे ६० वर्षांवरील, तर ९ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. तिघांचे वय ४० वर्षांखालील होते.मुंबईत कोरोनाचे ४६२ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या १३ हजार ७४९ वर पोहचली आहे. तसेच १५४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल २५८९ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून  देण्यात आली.