750 गावे पुराच्या विळख्यात; देशातील विविध भागात पावसाचा कहर

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर(Heavy Rain in Maharashtra and India) केला असून वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात 750 गावे पुराच्या विळख्यात सापडली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील 11 धरणांमध्ये गळती सुरू झाली आहे. यापैकी कोणतेही एक धरण फुटले मोठी दुर्घटना घडू शकते. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात, मुसळधार पावसामुळे 750 गावांना पूर आला आहे. अनेक गावांमध्ये लोक अजूनही अडकलेले आहेत.

  मुंबई : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर(Heavy Rain in Maharashtra and India) केला असून वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात 750 गावे पुराच्या विळख्यात सापडली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील 11 धरणांमध्ये गळती सुरू झाली आहे. यापैकी कोणतेही एक धरण फुटले तर मोठी दुर्घटना घडू शकते. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात, मुसळधार पावसामुळे 750 गावांना पूर आला आहे. अनेक गावांमध्ये लोक अजूनही अडकलेले आहेत. औरंगाबाद-धुळे महामार्गावर मंगळवारी पावसानंतर भूस्खलन झाले. तेव्हापासून वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावर चिखल मोठा चिखल साचला आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

  उत्तरप्रदेशात स्थिती बिकट

  उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातही पूरस्थिती आहे. जवळपासची अनेक गावे पाण्यात बुडाली आहेत. नद्यांच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. या भीतीने लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्याकडे पक्की घरे आहेत त्यांनी छतावर आश्रय घेतला आहे.

  मध्यप्रदेशात 16 जिल्ह्यांमध्ये थैमान

  मध्य प्रदेशात मान्सूनचा प्रभाव दिसून येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये नीमच, भोपाळ, टीकमगढसह 16 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अधूनमधून पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळी भोपाळ-इंदूरमध्ये पाऊस पडला, तर छिंदवाडामध्ये दीड तासात जोरदार पावसाने हजेरी लावली.

  गुजरातमध्ये 10 तासांत 11 इंच पाऊस

  गुजरातच्या सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. वलसाड जिल्ह्यातील उमरगाम आणि वापीमध्ये पाऊस ही लोकांसाठी समस्या बनत आहे. येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उमरगाममध्ये 10 तासांत 11 इंच पाऊस झाला आहे.