धारावीत मंदावला लसीकरणाचा वेग, आत्तापर्यंत केवळ ११ टक्के नागरिकांनी घेतली लस

आशियातील सर्वात मोठी असलेल्या धारावी झोपडपट्टीत(Dharavi Slum) सुमारे सात लाख लोकसंख्या आहे. येथील कोरोना रुग्णसंख्या (Corona patients)आटोक्यात आली आहे. मात्र लसीकरणाला अजूनही फारसा वेग आलेला नाही. आतापर्यंत फक्त ७६ हजार जणांचे लसीकरण(Vaccination In Dharavi) झाले आहे.

    मुंबई : धारावीत(Dharavi) सुमारे सात लाख लोकसंख्या असून यातील केवळ ७६ हजार म्हणजे ११ टक्के(Dharavi Vaccination Update) नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात सुमारे ६० टक्के लसीकरण हे पालिकेच्या केंद्रावर झाले असल्याची माहिती मुंबई(Mumbai) पालिकेच्या(BMC) आराेग्य खात्याने(Health department) दिली.

    आशियातील सर्वात मोठी असलेल्या धारावी झोपडपट्टीत सुमारे सात लाख लोकसंख्या आहे. येथील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र लसीकरणाला अजूनही फारसा वेग आलेला नाही. आतापर्यंत फक्त ७६ हजार जणांचे लसीकरण झाले आहे.

    धारावीसह मुंबईतील झोपडपट्ट्यांतही लसीकरणाबाबत अजूनही जनजागृती झालेली नाही. लसीकरणाबाबत भिती व अजूनही गैरसमज आहे. त्यामुळे लसीकरणाला फारसा पाठिंबा मिळत नसल्याने धारावीमध्ये आता पालिकेने स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू केले. मार्चमध्ये येथे केवळ १३४९ जणांनी लस घेतली होती. यानंतर पालिकेने लससाक्षरता करण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली आणि लसीकरणाचा प्रतिसाद वाढला. त्यामुळे एप्रिलमध्ये ही संख्या १० हजार ६४८ वर गेली.

    लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यासाठी धारावीत आणखी दोन केंद्र सुरू करण्यात आली. मे महिन्यात पालिकेला लशींचा पुरेसा साठाच न मिळाल्यामुळे लसीचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला. धारावीत अनेक उद्योगधंदे, कारखाने आहेत. येथील कष्टकरी, श्रमिकांची रोजगारासाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे मत येथील संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केले. दरम्यान, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर येथे लसीकरणावर भर दिला जात असल्याचे प्रशासनाकड़ून सांगण्यात आले.