राज्यात ७,७६१ नवीन रुग्णांची नोंद तर १६७ रुग्णांचा मृत्यु

शुक्रवारी राज्यात ७,७६१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,९७,०१८ झाली आहे. आज १३,४५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,६५,६४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२७ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,०१,३३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई : शुक्रवारी राज्यात ७,७६१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,९७,०१८ झाली आहे. आज १३,४५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,६५,६४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२७ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,०१,३३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात शुक्रवारी १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५०,३९,६१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,९७,०१८ (१३.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ५,८५,९६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,५७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ४४३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३०२३४ एवढी झाली आहे. तर ११ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५६७८ मृत्यूची नोंद करण्यात आली.