मुंबईत आज दिवसभरात ७८६ रुग्णांची नोंद ; तर राज्यात १२,५५७ नवीन रुग्ण

मुंबईत दिवसभरात ७८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७१०६४३ एवढी झाली आहे. तर २० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४९७१ मृत्यूची नोंद करण्यात आली.

    मुंबई: रविवारी राज्यात १२,५५७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,३१,७८१ झाली आहे. काल १४,४३३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ५५,४३,२६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,८५,५२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात रविवारी २३३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण २३३ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३८५ ने वाढली आहे.

    हे ३८५ मृत्यू, पुणे-१३७, नागपूर-४५, औरंगाबाद-३३, यवतमाळ-३१, अहमदनगर-२६, कोल्हापूर-२६, नाशिक-१८, सातारा-१२, लातूर-७, सांगली-७, गडचिरोली-६, बीड-५, गोंदिया-५, ठाणे-५, हिंगोली-४, सोलापूर-४, रत्नागिरी -३, सिंधुदुर्ग-३, अकोला-१, चंद्रपूर-१, धुळे-१, जालना-१, नांदेड-१, नंदूरबार-१, रायगड-१ आणि वाशिम-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२टक्के एवढा आहे.
    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६५,०८,९६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,३१,७८१ (१५.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात १३,४६,३८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ७८६ रुग्ण
    मुंबईत दिवसभरात ७८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७१०६४३ एवढी झाली आहे. तर २० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४९७१ मृत्यूची नोंद करण्यात आली.