लोकलमधील फुकट्यांकडून ८.६० कोटी वसुल; ५१ दिवसांत दीड लाख प्रवाशांवर कारवाई

लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेचय मुंबई मंडळावर विना तिकिट प्रवास करणाऱ्यांविरोधात तपासणी मोहीम सुरू असून १ लाख ३४ हजार ७९९ प्रवाशांकडून ८.६० लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे. मुंबई मंडळावर १ एप्रिल ते २१ मे पर्यंत उपनगरीय आणि बिगर उपनगरीय ट्रेनमध्ये नियमित तिकिट तपासणीदरम्यान हा दंड वसुल करण्यात आला. गेल्या ५१ दिवसांमध्ये उपनगरीय मार्गांवर ७५ हजार ७९३ अवैध प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून दंड स्वरुपात ३.९७ कोटी वसुल करण्यात आले. बिगर उपनगरीय अर्थात लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये ५४ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

    मुंबई : लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेचय मुंबई मंडळावर विना तिकिट प्रवास करणाऱ्यांविरोधात तपासणी मोहीम सुरू असून १ लाख ३४ हजार ७९९ प्रवाशांकडून ८.६० लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे. मुंबई मंडळावर १ एप्रिल ते २१ मे पर्यंत उपनगरीय आणि बिगर उपनगरीय ट्रेनमध्ये नियमित तिकिट तपासणीदरम्यान हा दंड वसुल करण्यात आला.
    गेल्या ५१ दिवसांमध्ये उपनगरीय मार्गांवर ७५ हजार ७९३ अवैध प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून दंड स्वरुपात ३.९७ कोटी वसुल करण्यात आले. बिगर उपनगरीय अर्थात लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये ५४ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

    ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरूपयोग, अनियमित तिकिटावर प्रवास करणे, ई तिकिटसाठी सिस्टम जनरेट तिकिटचा अनुचित रुपांतर, तिकिटाची रंगीत झेरॉक्स कॉपीसह प्रवास करणे, बनावट ओळखपत्र बाळगणे, तिकिट हस्तांतरण इत्यादी अनियमित प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

    राज्य सरकारच्या डिजास्टर मॅनेजमेंट अॅक्ट अंतर्गत जारी गाईडलाईनचे उल्लंघन करणाऱ्या १४२३ जणांवर २८ एप्रिल ते २१ मे दरम्यान कारवाई करण्यात आली. मुंबई लोकलमध्ये केंद्र, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु, यादरम्यान बनावट ओळखपत्र व इतर अवैध माध्यमांचा वापर करून प्रवास केल्याप्रकरणी ७.१२ लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे. मुंबई मंडळावर १७ एप्रिल ते २१ मे पर्यंत विना मास्क १०६२ प्रवाशांवर कारवाई करत २.०३ लाख दंड वसुल करण्यात आला आहे.