राज्यात ८ हजार ५३५ इतक्या नवीन रुग्णांची नोंद, तर मुंबईत दिवसभरात ५५८ बाधित रूग्ण, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ %

मुंबईत दिवसभरात ५५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२७६९४ एवढी झाली आहे. तर १५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५६२७ मृत्यूची नोंद करण्यात आली.

    मुंबई – रविवारी राज्यात ८,५३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,५७,७९९ झाली आहे. काल ६,०१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,१२,४७९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१६,१६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात रविवारी १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १५६ मृत्यूंपैकी ११८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर अद्ययावत झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १९४ ने वाढली आहे. हे १९४ मृत्यू, पुणे-१५४, सांगली-१८, ठाणे-६, रत्नागिरी-४, रायगड-३, अमरावती-२, पालघर-२, सोलापूर-२, जळगाव-१, कोल्हापूर-१ आणि सिंधुदूर्ग-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.

    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४०,१०,५५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,५७,७९९ (१३.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,९६,२७९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,७७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ५५८

    मुंबईत दिवसभरात ५५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२७६९४ एवढी झाली आहे. तर १५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५६२७ मृत्यूची नोंद करण्यात आली.