राज्यात ८,१२९ नवीन रुग्ण; मुंबईत दिवसभरात ५३० रुग्णांची नोंद

सोमवारी राज्यात ८,१२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,१७,१२१ झाली आहे. आज १४,७३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,५४,००३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,४७,३५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  मुंबई : सोमवारी राज्यात ८,१२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,१७,१२१ झाली आहे. आज १४,७३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,५४,००३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,४७,३५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  दरम्यान राज्यात सोमवारी २०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. काल नोंद झालेल्या एकूण २०० मृत्यूंपैकी १३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १३९२ ने वाढली आहे.

  हे १३९२ मृत्यू, पुणे-२५३, अहमदनगर-२२२, नाशिक-१४१, नांदेड-१३३, सातारा-१०३, लातूर-८०, नागपूर-७५, अकोला-६७, सांगली-६५, ठाणे-४३, धुळे-३९, नंदूरबार-३५, रत्नागिरी-२०, वर्धा-२०, जळगाव-१९, यवतमाळ-१८, परभणी-१२, बीड-१०, हिंगोली-७, कोल्हापूर-७, सोलापूर-६, रायगड-५, उस्मानाबाद-४, पालघर-३, औरंगाबाद-१, बुलढाणा-१, जालना-१, सिंधुदुर्ग-१ आणि वाशिम-१ असे आहेत.

  सध्या राज्यातील मृत्यूदर १.९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८२,१५,४९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,१७,१२१ (१५.४८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४९,२५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,९९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  मुंबईत दिवसभरात ५३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७१६१९० एवढी झाली आहे. तर १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५२०२ मृत्यूची नोंद करण्यात आली.

  हे सुद्धा वाचा