प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना विषाणू महामारीमुळे घरातूनच काम करायची सवय लागल्याने भारतातील 83 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसला जाण्याची इच्छाच नाही. कोरोना लस आल्याशिवाय ऑफिसमध्ये जाऊन काम करण्यास हे कर्मचारी उत्सुक नाहीत, असं एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे. ऑस्ट्रेलियातील अटलाशियन कॉर्पोरेशन या सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचा सर्व्हे करून घेतला आणि त्याचे निष्कर्ष शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

मुंबई (Mumbai).  कोरोना विषाणू महामारीमुळे घरातूनच काम करायची सवय लागल्याने भारतातील ८३ टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसला जाण्याची इच्छाच नाही. कोरोना लस आल्याशिवाय ऑफिसमध्ये जाऊन काम करण्यास हे कर्मचारी उत्सुक नाहीत, असं एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे. ऑस्ट्रेलियातील अटलाशियन कॉर्पोरेशन या सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचा सर्व्हे करून घेतला आणि त्याचे निष्कर्ष शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

कंपनीच्या बेंगळुरूतील इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख आणि साइट हेड दिनेश अजमेरा म्हणाले,‘ भविष्यात न्यू नॉर्मल परिस्थितीत ऑफिसातली कामाची पद्धत, नाती कशी असतील याचा अंदाज या अभ्यासातून बांधता येईल. ज्यांना खरोखर कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय अशांकडून आम्ही माहिती घेतली आहे. आमच्या कंपनीत जगभरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आम्ही सर्व्हे करून घेतला आहे. या अभ्यासातील निष्कर्षांचा वापर करून आम्ही भविष्यातील नीती ठरवू शकू.’

प्रवास करुन काम करताना येताना अनेक आव्हानांचा सामना करताना काही जणांची अजूनही दमछाक होत आहे तर अनेकांना ऑफिसमधल्या प्रेझेंटेशनच्या वातावरणातून सुटका झाल्यासारखं वाटत आहे, असं या अभ्यासाचं नाव असून कोविड आधीच्या परिस्थितीपेक्षा आता त्यांना जॉब सॅटिसफॅक्शन मिळत असल्याचं 70 टक्के कर्मचाऱ्यांचं मत असल्याचं यात म्हटलं आहे.

अटलाशियन कॉर्पोरेशनने ऑस्ट्रेलियातील रिसर्च एजन्सी पेपरजायंटला आपल्या ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेतील कर्मचाऱ्यांचा सर्व्हे करायला सांगितला होता. ऑब्झर्व्हेशन, क्वालिटेटिव्ह आणि एथनोग्राफिक रिसर्च मेथडॉलॉजी वापरून हा सर्व्हे करायला सांगितला होता. भारतातील टीयर १, २ आणि ३ शहरांतील १४२५ कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात या सर्व्हेत भाग घेतला होता. भारतातील 86 टक्के कर्मचाऱ्यांना आधीपेक्षा अधिक जवळीक निर्माण झाल्यासारखं वाटत असून 75 टक्के लोकांना त्यांचं टीमवर्क कोविड आधीच्या परिस्थितीच्या तुलनेत सुधारल्यासारखं वाटत आहे, असा निष्कर्ष समोर आला आहे.