राज्यातील ८४ टक्के नागरीकांचा ३१मे पर्यंत टाळेबंदी निर्बंध सुरू ठेवण्याच्या बाजूने कौल; लोकल सर्कल सर्वेक्षणाचा निष्कर्ष

    मुंबई : एका ऑनलाईन पाहणी मध्ये राज्यातील ८४ टक्के नागरीकांनी १५ मे नंतर, ३१ मे पर्यंत टाळेबंदी निर्बंध सुरू ठेवण्याच्या बाजूने कौल दिला आहे. कोविड-१९ ची तिसरी लाट येवू शकते आणि ती दुस-या लाटेच्या तुलनेत भयानक असेल या तज्ज्ञांच्या इशा-यानंतर राज्य सरकार कामाला लागेल आहे. पण नागरीकांनीही त्यासाठी मानसिकता तयार केल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. राज्याच्या ३० जिल्ह्यातील १८ हजार लोकांना या ‘लोकल सर्कल’ नावाच्या सर्वेक्षणात सहभागी करुन घेण्यात आले होते.

    वस्तु आणि सेवा घरपोच हवी

    या पैकी ४३ टक्के नागरीकांनी टाळेबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तु आणि सेवा घरपोच देण्याची सोय असावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. या सर्वेक्षणात ७१ टक्के नागरीकांनी घरपोच सेवा ही नागरीकांना सुरक्षीत ठेवण्यचा चांगला पर्याय असल्याचे सूचविले आहे.या सर्वेक्षणात महत्वाचे म्हणजे ६० टक्के लोकांनी अनेक महत्वाच्या वस्तु तसेच वर्क फ्रॉम होम करीता गँजेटस तीन महिन्यांसाठी स्वस्तात देण्यात यावी अशी देखील मागणी केली आहे.

    ३० जिल्ह्यात १८ हजार जणांचे सर्वेक्षण

    राज्याच्या ३० जिल्ह्यातील १८ हजार लोकांना या ‘लोकल सर्कल’ नावाच्या सर्वेक्षणात सहभागी करुन घेण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेआणि मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या संकल्पनेतून हे सर्वेक्षण घेण्यात आले, जेणे करून त्यांना निर्णय घेताना जन मानसाचा अंदाज यावा हा या सर्वेक्षणाचा हेतू होता. ५ ते ९ मे दरम्यान या सर्वेक्षणात ऑनलाइन सहभागातून प्रश्न विचारण्यात आले होते.

    ३ महिन्यांच्या नियोजनासाठी सर्वेक्षण

    राज्य सरकार करत असलेल्या उपाय योजना आणि टाळेबंदीचे निर्बंध याबाबत नागरीकांची मते काय आहेत हे यामध्ये प्रामुख्याने जाणून घेण्यात आले. राज्यातील अर्थकारणाला गती देण्यासाठी तसेच कोविड-१९ चा संसर्ग रोखताना नागरीकांना कमीत कमी त्रास होईल अश्या पध्दतीने राज्य सरकारने अनेक चर्चा बैठकांनतर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती लोकल सर्कलचे सचिन तापाडिया यांनी दिली. या सर्वेक्षणाचा दुसरा हेतू हा होता की येत्या काळात तिसरी, चौथी पाचवी अश्या लाटा येत राहिल्या तर जन जीवन सुरळीत ठेवायचे अर्थकारण देखील सुरक्षीत ठेवायचे तर टाळेबंदी सारख्या उपाय योजना कश्या करता येतील याचा लोकांच्या मनाचा अंदाज काय आहे ते शोधणे आवश्यक होते. पुढील ३ महिन्यांसाठी लोकांच्या गरजा आणि त्यानुसार उपाय योजना काय असाव्या याचे नियोजन करणे त्यामुळे सुलभ होणार आहे. या सर्वेक्षणात ६ ६ टक्के पुरूष तर ३४ टक्के स्त्रियांचा सहभाग होता.

    २८ टक्के लोकाना टाळेबंदी नको

    पुढील तीन महिन्यांसाठी राज्यात वर्क फ्रॉम होम ला चालना देण्यासाठी लोकांना नव्या सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या तर ते कामाच्या निमित्ताने कमीत कमी घराबाहेर येतील हे या सर्वेक्षणातून प्रामुख्याने स्पष्ट झाले आहे. ६० टक्के लोकांना लँपटॉप, वायफाय या सारख्या सुविधा  हव्या असल्याचे दिसून आले. तर २६ टक्के लोकांना कामाच्या ठिकाणी आवश्यक पंखे, फर्निचर, अश्या गोष्टी आवश्यक असल्याचे सांगितले. लहान मुलांच्या संगोपनासाठी आणि त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी खेळणी, पुस्तके, शालेय अभ्यासक्रम. अथवा घरच्या घरी करता येतील अश्या गोष्टींची साधने मुलांना उपलब्ध करावी असे ६० ते ८५ टक्के लोकांचे मत आहे. या काळात बाहेर शॉपिंगला जाण्याची इच्छा देखील ४३ टक्के लोकानी व्यक्त केली आहे तर २८ टक्के लोकाना बाजार पूर्वी प्रमाणे सुरू असावेत असे वाटले. साधारण ४५०० लोकांनी प्रश्नावलीच्या बाहेरची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.