८४ जागा टिकवून दाखवाव्यात; काँग्रेसला आव्हान देणाऱ्या भाजपाला भाई जगताप यांचे प्रत्युत्तर

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी होऊ घातली आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. काँग्रेसने वॉर्डच्या पुनर्रचना करून आपल्या सध्याच्या ३० जागा वाचवून दाखवाव्यात असे खुले आव्हान भाजपाने दिले आहे. त्यावर प्रतित्युर देत भाजपाने आपल्या ८४ जागा टिकवून वाचवून दाखवाव्यात असे प्रतिआव्हान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी दिले आहे.

    मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी होऊ घातली आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. काँग्रेसने वॉर्डच्या पुनर्रचना करून आपल्या सध्याच्या ३० जागा वाचवून दाखवाव्यात असे खुले आव्हान भाजपाने दिले आहे. त्यावर प्रतित्युर देत भाजपाने आपल्या ८४ जागा टिकवून वाचवून दाखवाव्यात असे प्रतिआव्हान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी दिले आहे.

    मुंबईमधील नालेसफाईची पाहणी आज भाई जगताप यांनी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा, काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या उपस्थितीत केली. या पाहणीनंतर भाजपाने काँग्रेसला दिलेल्या आव्हानाबाबत जगताप बोलत होते. यावेळी बोलताना भाजपच्या आव्हानाला मी काही प्रतिआव्हान करणार नाही. मी जेव्हा काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष झालो तेव्हाच भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबईमधील ८४ जागा टिकवून दाखवाव्यात असे आवाहन केले  आहे.

    आमच्या ३० जागांची तुम्ही चिंता करण्याचे कारण नाही असे जगताप म्हणाले. वॉर्ड पुनर्रचना हा कायदेशीर मुद्दा आहे. भाजपाने आपल्या फायद्या करता अनेक गोष्टी केल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती दिली आहे. ४५ वॉर्ड पेक्षा अधिक वॉर्ड असे आहेत त्याचे सीमांकन अयोग्य पद्धतीने केले आहे. आम्हाला सर्व २२७ वॉर्डचे सीमांकन करण्यास सांगितले जात आहे. मग तुम्ही सर्व जागांचे सीमांकन का केले नाही असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला. सीमांकन हा प्रश्न देशाच्या पंतप्रधानांच्या लहरी पणासारखा नाही. फडणवीस यांनी लहरीपणा केला असा टोलाही जगताप यांनी लगावला.