मुंबईमध्ये कोरोनाचे ८८४ नवे रुग्ण ; कोरोनाबाधित ४१ रुग्णांचा मृत्यू

मुंबई: मुंबईत शनिवारी ८८४ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार ३९६ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६९६ वर पोहचला आहे. मुंबईतील

मुंबई: मुंबईत शनिवारी ८८४ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार ३९६ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६९६ वर पोहचला आहे. 

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ  मागील काही दिवसांपासून कायम असून शनिवारी ८८४ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार ३९६ वर पोहचली आहे. मुंबईमध्ये ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ६९६ वर पोचली आहे.मृत्यू झालेल्या ४१ जणांमधील १४ मृत्यू हे ७ ते १२ मे दरम्यान झाले आहेत. 

तसेच २४ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २६ पुरुष तर १५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील दोघांचे वय ४० वर्षांखालील, २७ जण हे ६० वर्षांवरील, तर १२ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ६४५ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या १८ हजार ६७२ वर पोहचली आहे. तसेच २३८ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ४८०६ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.