The second wave of corona; No entry to visitors to MLA residences

कोरोनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली असून गरीब जनतेला धीर देण्याची गरज आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारने मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी 900 कोटींचे टेंडर काढले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला आमदार निवासावर खर्च करण्यापेक्षा मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

    मुंबई : कोरोनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली असून गरीब जनतेला धीर देण्याची गरज आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारने मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी 900 कोटींचे टेंडर काढले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला आमदार निवासावर खर्च करण्यापेक्षा मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

    नांदगावकर यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, कोरोनाने अनेक परिवार उध्वस्त केले, यातील अनेकांची आर्थिक स्थिती देखील हलाखीची आहे त्यामुळे कोरड्या सहानुभूतीची नव्हे तर भरीव मदतीची आवश्यकता आहे. नियोजित आमदार निवास कधीही बनवता येईल परंतु तेवढ्याच खर्चात (900 करोड) मृत्युमुखी पडलेल्याना प्रत्येकी 1 लाख रुपये देता येतील व ते देणे उचित ठरेल, अशाने त्यांना खरच मोठा आधार भेटेल.