corona

मुंबई : मुंबईमध्ये ९१७ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २५ हजार २३९ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६८९० वर पोहचला आहे. 

मुंबईमध्ये ९१७ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३३ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३७ पुरुष तर ११ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २५ जण हे ६० वर्षांवरील, तर २० जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. 

मुंबईत कोरोनाच्या ११५४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ९९ हजार १४७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के आहे. तर शहरात १८ हजार ९०५ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.