एसटीचे ९७ हजार कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेत; वेतनाचा प्रश्न मार्गी लागला जाईल असे परिवहन राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे आश्वासन

मार्च २०२० पासून ते आतापर्यंत ७ हजार कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडाले आहे. महामंडळाला प्रवासी उत्पन्नच मिळत नसल्याने गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले. त्यामुळे राज्य सरकारकडून आर्थिक मदत घेऊनच वेतन देण्यात आले. जानेवारी ते जून २०२१ या दरम्यानही मदत घेण्यात आली हाेती, ज्यामुळे वेतन प्रश्न काहीसा सुटला होता. परंतु आता जुलै महिन्याचे वेतन ऑगस्ट महिन्यातील १७ तारीख उलूटून गेली तरी होऊ शकलेले नाहीये, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंताेष पसरला आहे.

    मुंबई: काेरोनामुळे लागलेले निर्बंध, त्यामुळे दुरावलेले प्रवासी, त्यातच इंधनाची दरवाढ इत्यादी कारणांमुळे एसटी महामंडळ वर्षभरापासून आर्थिक अडचणीत आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. दर महिन्याच्या सात तारखेला होणारे वेतन ऑगस्ट महिन्याची १७ तारीख उलटूनही हाती आलेले नाही. त्यामुळे घरखर्च भागवण्याची मोठी समस्या कर्मचाऱ्यांसमोर उभी आहे.

    दरम्यान,वेतनासाठी एसटी महामंडळाने ६०० कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडे मागितली आहे, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काॅंग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली, यावेळी लवकरात लवकर वेतनाचा प्रश्न मार्गी लागला जाईल,असे आश्वासन देण्यात आले.

    मार्च २०२० पासून करोना व निर्बंधांमुळे एसटी सेवेपासून प्रवासी दुरावले. सणासुदीच्या दिवसातही प्रवासी प्रवास करत नसल्याचे दिसून येत आहे. करोनाच्या पहिल्या लाटेतून सुटका होत असतानाच दुसऱ्या लाटेमुळेही एसटीला फटका बसला. त्यातच इंधनाचे दर वाढल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. मार्च २०२० पासून ते आतापर्यंत ७ हजार कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडाले आहे. महामंडळाला प्रवासी उत्पन्नच मिळत नसल्याने गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले. त्यामुळे राज्य सरकारकडून आर्थिक मदत घेऊनच वेतन देण्यात आले. जानेवारी ते जून २०२१ या दरम्यानही मदत घेण्यात आली हाेती, ज्यामुळे वेतन प्रश्न काहीसा सुटला होता. परंतु आता जुलै महिन्याचे वेतन ऑगस्ट महिन्यातील १७ तारीख उलूटून गेली तरी होऊ शकलेले नाहीये, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंताेष पसरला आहे.

    दरम्यान, संदर्भात बुधवारी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान लवकरात लवकर वेतनाचा प्रश्न मार्गी लागला जाईल असे अाश्वासन त्यांनी दिले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, चंद्रकांत काकडे, डी ए.लीपने, सी. पी. राठोड, फैयाज पठाण, प्रमोद गुंडतवार, सुशांत इंगळे, गणेश शेंडगे, मनीषा कालेश्वर, कविता लांजेवार, संगीता कळंबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.