लसीचे दोन डोस घेतल्याने कोरोनापासून ९८ टक्के बचाव : केंद्राची माहिती मोठी बातमी

कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याने कोरोनापासून ९८ टक्के सुरक्षा मिळते. तर कोरोना लसीचा एकच डोस घेतल्याने कोरोनापासून ९२ टक्के बचाव होतो,असे डॉ. वीके पॉल यांनी म्हटले आहे. 

    देशात कोरोना लसीकरण मोहीमेला चांगलाच वेग आला आहे . मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. असले तरीही लसीबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कोणती लस किती प्रभावी याविषयी लोकांना मनात अनेक प्रश्न आहेत. नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी कोरोना लसी संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

    कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याने कोरोनापासून ९८ टक्के सुरक्षा मिळते. तर कोरोना लसीचा एकच डोस घेतल्याने कोरोनापासून ९२ टक्के बचाव होतो,असे डॉ. वीके पॉल यांनी म्हटले आहे.

    देशात सध्या दररोज जवळपास ५० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. आज जगभरात कोरोना विरोधी अनेक लसी तयार करण्यात आल्या आहेत. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची शक्यता फार कमी आहे.