राज्यात ९,८३० नवीन रुग्ण; मुंबईत दिवसभरात ६६० रुग्णांची नोंद

गुरुवारी राज्यात ९,८३० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,४४,७१० झाली आहे. गुरुवारी ५,८९० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,८५,६३६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याच सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४% एवढे झाले आहे.

    मुंबई : गुरुवारी राज्यात ९,८३० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,४४,७१० झाली आहे. गुरुवारी ५,८९० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,८५,६३६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याच सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४% एवढे झाले आहे.

    राज्यात गुरुवारी २३६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण २३६ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४०० ने वाढली आहे.

    हे ४०० मृत्यू, अहमदनगर-१३७, पुणे-६३, नागपूर-३२, नाशिक-२८, सांगली-२३, औरंगाबाद-२१, रत्नागिरी-२०, सोलापूर-१३, कोल्हापूर-११, सातारा-९, ठाणे-६, बीड-५, रायगड-५, अकोला-४, भंडारा-३, हिंगोली-३, नांदेड-३, बुलढाणा-२, लातूर-२, उस्मानाबाद-२, वर्धा-२, यवतमाळ-२, चंद्रपूर-१, नंदूरबार-१, पालघर-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८८,५७,६४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,४४,७१० (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५०,६६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,९६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ६६० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७१७८३२ एवढी झाली आहे. तर २० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५२४७ मृत्यूची नोंद करण्यात आली.

    हे सुद्धा वाचा