Child dies after balloon gets stuck

दवाखान्यात जाताना तो बेशुद्ध पडला, आम्ही त्याला प्रथम अंधेरीच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये नेले ज्याने त्याला नानावटी रुग्णालयात नेण्यास सांगितले. आम्ही त्याला तिथे नेले जेथे डॉक्टरांनी त्याला शुध्दिवर आणण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : एका दुःखद घटनेत अंधेरी येथील ४.५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू (died ) घश्यात फुगा अडकल्यामुळे (balloon stuck in his throat) झाला आहे. फुगा त्याच्या घशात अडकला गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास देवराज आणि दोन भाऊ अय्याश आणि ३ वर्षीय आदित्य त्यांच्या घरी फुगा (balloon ) घेऊन खेळत असताना ही घटना घडली. त्यांचे वडील सूरज हे कामावरुन घरी परते तेव्हा त्यांनी मुलांना खेळताना पाहिले.(A 4-year-old boy died due to a balloon stuck in his throat)

वडीलांच्या म्हणण्यानुसार, “तिघेही एकत्र खेळत होते, देवराज झोपून होता आणि फुग्यासोबत खेळत होता. काय चूक झाली ते माहित नाही परंतु अचानक बलून त्याच्या तोंडात खेचला गेला आणि देवराज अस्वस्थ होऊ लागला. मी लगेचच बलून त्याच्या जवळ गेलो आणि माझ्या बोटांनी फुगा बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला पण मला शक्य झाले नाही. मग मी आणि माझ्या पत्नीने त्याला पाणी दिले परंतु यामुळे काहीच फायदा झाला नाही. आणि तो जोरात श्वास घेऊ लागला. मला वाटले की काहीतरी चुकले आणि ताबडतोब त्याला दवाखान्यात दाखल केले असे मुलाच्या वडिलांनी सांगितले.

वडील सुरज यांनी पुढे सांगितले की, दवाखान्यात जाताना तो बेशुद्ध पडला, आम्ही त्याला प्रथम अंधेरीच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये नेले ज्याने त्याला नानावटी रुग्णालयात नेण्यास सांगितले. आम्ही त्याला तिथे नेले जेथे डॉक्टरांनी त्याला शुध्दिवर आणण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ ४५ मिनिटे डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. परंतु श्वास अडकल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला. असे मुलाच्या वडिलांनी सांगितले आहे.

कूपर रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याच्या घशातून फुगा खाली खोलवरुन काढला होता. हा फुगा त्याचा कंठ दाटून आत अडकला होता, असे अहवालात म्हटले आहे. त्याच्या निधनानंतर अंधेरी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदविला आहे.

अंधेरी येथील गुंडावली येथील रहिवासी सूरज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दुकान घरगुती साधनांचे दुकान चालवित आहे. या घटनेपासून मुलाची आई सतत रडत असल्याचे सूरज यांनी सांगितले.